स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. दिनांक ६ जुलै२०२३ भोंजा हवेली येथे शेळीपालन व्यवसाय करणारे लाभार्थी यांच्या शेळ्यांना आंत्रविषार (ई.टी) लसीकरण मेळावा संपन्न.
परंडा पशुसंवर्धन विभाग अंतर्गत सोनारी पशुसंवर्धन विभाग चे पशुधन विकास अधिकारी डॉ ऋषिकेश जगदाळे व शुभम देशमुख यांनी १३५ शेळ्यांना आंत्रविषार (ईटी) लस अल्प दरात देऊन शेतकऱ्यांना शेळी विषयांवर डॉ जगदाळे यांनी माहिती दिली व या लसीचा फायदा शेळ्या निरोगी राहण्यासाठी उपयुक्त ठरते. पहिल्या पाऊसाने उगवलेला हिरवा चारा व बदलेल्या पाण्यामुळे शेळ्यांना ताप, जुलाब, कळपात जास्तीचा आरडाओरड यामुळे शेळ्या मरण पावण्याचे प्रमाण वाढणे या साठी पहिल्या पाऊसात काळजी घ्यावी लागते ती पहिल्या डोस/लसीकरण ची म्हणून डायरेक्टर गणेशदादा नेटके यांनी पशुधन विकास अधिकारी डॉ जगदाळे यांच्याशी संपर्क साधला असता तात्काळ लस उपलब्ध करून १३५ शेळ्यांना आंत्रविषार (ईटी) लस टोचवण्यात आली यावेळी मा सदस्य गणपती कांबीलकर, सरपंच समाधान कोळी, डायरेक्टर गणेशदादा नेटके, शेळीपालक अजित नेटके, शेळीपालन उद्योजक देविदास सरवदे, विजय नेटके, कुमार नेटके, रोहित नेटके, जगन्नाथ सरवदे, जाधव इ उपस्थित होते.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.