जिल्हा परिषद उर्दु हायस्कुल परंडा येथील मुख्याध्यापक खान रउफ युसुफ यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न

starmazanews_v

starmazanews_v


स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी शहाजी चंदनशिवे
परंडा –
दिनांक 04/07/2023 येथील जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल परंडा येथील श्री खान रऊफ युसुफ मु. अ. यांचा सेवानिवृत्ती व निरोप समारंभाचा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला .
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुळे साहेब गटशिक्षण अधिकारी परंडा यांच्या हस्ते सत्कार समारंभ संपन्न झाला .
या कार्यक्रमासाठी मुलांचे हायस्कूल कन्या हायस्कूल उर्दू प्राथमिक इंदिरा वस्ती आणि उर्दू हायस्कूल परंडा या शाळेतील सर्व मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडला . या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी मुळे साहेबांनी (BEO) परंडा शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी सरांचे भावी आयुष्य भरभराटीचे व सुख समृद्धीचे आणि आरोग्यमय जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून शुभेच्छा दिल्या . शाळेतील शिक्षक खतीब , बांगी जमील , समीना दखणी अंजली चंदनशिवे (शिंदे) , समाधान पवार इंगळे गवळी पवार यांनी आपले विचार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या . तसेच इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये मिळालेले प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले .आठवी ते बारावीच्या ज्या विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये नंबर आला होता त्या विद्यार्थ्यांचा मेडल देऊन सत्कार करण्यात आला आणि सत्कारमूर्ती श्री खान सरांनी आपल्या मनोगतात शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी साहेबांच्या निदर्शनात आणून दिले . पुढील कार्यासाठी नवीन मु अ. श्री बांगे यांना शुभेछा दिल्या . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीना दखणी व खतीब यांनी केले व बांगी जमील आभार व्यक्त केले .

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!