स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. अवैध रित्या वाळू उपसा करणाऱ्यावर महसूल विभागाची करडी नजर असल्याने वाळू माफियांवर एकापाठोपाठ एक कारवाई चा सपाटा महसूल कर्मचाऱ्यांकडून सुरूच आहे. यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले असून दिनांक ५ रोजी सायंकाळी ६ वा सुमारास मौजे वागेगव्हाण येथे सुमित भालचंद्र पाटील यांच्या मालकीचा अवैध वाळू उत्खनन करणारा ट्रॅक्टर महसूल विभागाकडून रंगेहाथ पकडण्यात आला व पुढील दंडात्मक कारवाई साठी तहसिल कार्यालयाचे आवारात लावण्यात आला. तहसिलदार घनशाम आडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी दुर्गाप्पा पवार, आबासाहेब सुरवसे, तलाठी चंद्रकांत कसाब, विशाल खळदकर, ज्ञानेश्वर गूळमीरे, तानाजी भोजने व वाहन चालक जिवन बनसोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.