मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रमात उस्मानाबाद जिल्हा राज्यात प्रथम  -देविदास पाठक

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रमात उस्मानाबाद जिल्हा राज्यात प्रथम

-देविदास पाठक -दुरदर्शन आकाशवाणी,दै. तरूण भारत

उस्मानाबाद हा केंद्र सरकारच्या निती आयोगाने आकांक्षित जिल्हा जाहीर केला असून या जिल्हयाच्या दरडोई उत्पनात वाढ व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजनांमधून प्रयत्न करत आहे.जिल्हयात नव उद्योजकांची संख्या वाढावी,बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे या उद्येशाने राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम अंमलबजावणीत उस्मानाबाद जिल्हयाने सन 2022-23 या आर्थिक वर्षात उद्दीष्ट ओलांडत राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे जिल्हयाला 650 उद्योग निर्मीतीचे उदिष्ट दिलेले असताना प्रत्यक्षात 702 उद्योग जिल्हयात सुरू झाले आहेत.

उस्मानाबाद जिल्हयातील ग्रामीण भागात याचा लाभ मोठया प्रमाणात झाला असून 520 नवे उद्योजकांनी 74.1 टक्के या योजनमूळे नविन उद्योग सुरू करण्यास हातभार लागला आहे.तर शहरी भागातील 182 (25.9 टक्के) नव उद्योजकांना याचा लाभ झाला आहे. यात प्रामुख्याने रेडीमेडगारमेंट 195 अन्न प्रक्रिया उद्योग 189 मल्टी सर्व्हीसेस 35 विधूत सेवा उद्योग 15 शेती व्यवसाय 35 फॅब्रीकेशन 39,ब्युटीपार्लर 41 मंगल कार्यसेवा 23 आणि इतर 140 असे सर्व मिळून 702 उद्योग यामुळे सुरू झाले आहेत.

जिल्हयात 405 महिलांना याचा लाभ झाला असून अनुसूचित जाती जमाती मधील 136 लाभार्थ्याना तर सर्वसाधारण प्रवर्गातील 5660 लाभार्थी यामुळे नविन उद्योग सुरू करू शकले आहेत.जिल्हयातील 702 नव उद्योगजकांना सात कोटी 92 लाख रुपयांचे नवउद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी मदत झाली आहे.

जिल्हयातल्या सर्वच बँकाशी जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांनी ठेवलेला संपर्क समन्वय आणि जिल्हा उद्योग केंद्रातील कर्मचाऱ्यांची मेहनत यामुळे हे उद्दीष्ट झाले आहे. यासोबत या मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रमाची जिल्हयात झालेली प्रसिध्दी, प्रचार, यामुळे झालेली जनजागृती यामुळे नव उद्योजक सुशिक्षित बेरोजगारांनी या योजनेच्या सहाय्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा या मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रमाचे उद्दीष्ट पूर्ण करू शकला परिणामी राज्यात सर्वप्रथम राहिला.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!