महाविद्यालयीन मुलीवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात १००मार्शल अन् २०० पोलिसांची गस्त

starmazanews_v

starmazanews_v


पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पुणे:- दर्शना पवार हत्याप्रकरण ताजे असतानाच पुण्याच्या सदाशिव पेठेत थरारक घटना घडली आहे. महाविद्यालयीन तरुणीवर सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला करण्यात आला.मुलीवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने दुपारी पोलीस आयुक्तांची भेट घेतली.पुणे शहरात लगेचच 100 मार्शल आणि 200 पोलिसांची गस्त सुरू करण्याचे आश्वासन पोलीस आयुक्तांनी काँग्रेसच्या शिस्त मंडळाला दिले मंगळवारी सकाळी सदाशिव पेठेत झालेल्या मुली वरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने दुपारी पोलीस आयुक्तांची भेट घेतली त्या त्यांनी शहराच्या काही वस्त्यांमध्ये पोलिसांची गस्त सुरू करण्याची मागणी केली आमदार रवींद्र दंगेकर, माझी ग्रह राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, व संजय बालगुडे, प्रशांत सुरसे, रमेश अय्यर ,चेतन अग्रवाल ,प्रथमेश अंबावणे यांच्या शिष्टमंडळात समावेश होता. पुण्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळत चालली असल्याची चिंता शिष्टमंडळाने व्यक्त केली. दंगेकर यांनी सांगितले की अशा प्रकारच्या हल्ल्यामुळे शहरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. पुण्यात शिक्षणासाठी म्हणून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या चार लाखापेक्षा जास्त आहे त्यातच आत्ता भीती निर्माण झाले आहे. पोलिसांचा वचक राहिलेली नाही पूर्वी पोलिसांची ग्रस्त होते असे ती आता होत नाही. मध्यवस्ती झोपडपट्टी येथे पोलिसांची गस्त सातत्याने व्हायला हवी तर इथेच अनेक अवधूत धंदे सुरू असताना तक्रारी आली की त्यांनी पोलिसांकडून दखल घेतली जात नाही वेळीच दखल घेतली गेली तर अशा घटना टाळणे शक्य आहे असे शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांना सांगितले त्यानंतर आयुक्तांनी लगेचच अशी गस्त सुरू करण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!