जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या वैयक्तिक क्रिडा स्पर्धेत श्रीम.चव्हाण पल्लवी यांचे यश

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज :- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

जिल्हा परिषद उस्मानाबादच्या वतीने अधिकारी व कर्मचारी क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा २०२२ – २३ मध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या . त्यामध्ये जि .प .कन्या प्राथ.शाळेच्या सहशिक्षिका श्रीम. पल्लवी जयप्रकाश चव्हाण यांनी १०० मीटर, २०० मीटर धावणे, रिंग टेनिस, भालाफेक , लांबउडी, खो – खो, कबड्डी, १००x ४०० मीटर रिले यांसारख्या वैयक्तिक व सांघिक क्रिडास्पर्धेत भाग घेतला होता . त्यापैकी २०० मीटर धावणे या वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत त्यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला .
त्याबद्दल गटशिक्षण कार्यालयातर्फे गटशिक्षणाधिकारी श्री . बाळकृष्ण मुळे साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी विस्तारअधिकारी अशोक खुळे साहेब, विस्तारअधिकारी दादा घोगरे साहेब, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक श्री .गोरख मोरजकर, केंद्रप्रमुख महादेव विटकर साहेब, केद्रप्रमुख श्री .संजीव मुसळे, प्रकल्प अधिकारी श्री . अंकुश डांगे , ननवरे मॅडम, दिपक बोंडगे, आप्पा महानवर, कांबळे साहेब, बाळासाहेब हजारे, आदि कर्मचारी उपस्थित होते .

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!