www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
सोमवार दिनांक 26 /6/ 2023 रोजी मांडेगाव तालुका बार्शी येथे छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांची 149 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष मांडेगावच्या सरपंच सौ शिवकन्या पंडित मिरगणे होत्या. त्यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला …प्रमुख वक्ते भीमराव कदम पुरोगामी विचार मंचाचे सल्लागार हे होते आपल्या भाषणात कदम सरांनी शाहू महाराजांचे संपूर्ण जीवन चरित्र. शैक्षणिक .सामाजिक .राजकीय.व आरक्षणाविषयी चे धोरण साध्या व सोप्या भाषेत सांगितले या कार्यक्रमासाठी नालंदा बुद्ध विहार बार्शी येथून महिला उपस्थित होत्या तसेच पुरोगामी विचार मंचचे सदस्य मकरोज बोकेफोडे, नागनाथ सोनवणे, कुमार चांदणे, बापू गायकवाड ,पत्रकार खुणे. संदीप बोकेफोडे उपस्थित होते राम सोनवणे यांनी नाष्टा ,चहा, कार्यक्रमासाठी संपूर्ण व्यवस्था व्यवस्थित पार पाडली. सोनवणे गुरुजी पुण्यावरून येऊन मांडेगाव येथील बुद्ध विहारात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी खूप प्रयत्न केले आम्हाला कौतुक वाटले ..
आभाराचे काम, नागनाथ सोनवणे यांनी पार पाडले विहारातील सर्व महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रम पार पडला सर्व उपस्थितांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा ज्या दिल्या होत्या त्याचे पोस्टर व संविधानाची उद्देशिका आलेल्या सर्व महिलांना व पुरुषांना देण्यात आली याप्रसंगी राम सोनवणे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासाठी शाहू महाराजांचा फोटो सरपंच सौ शिवकन्या पंडित मिरगणे यांना सुपूर्द केला .चांगला उपक्रम राम सोनवणे यांनी पार पाडल्याचे दिसून आले… राम सोनवणे यांच्यासारखी समाजात प्रत्येक गावात तरुण होतकरू व समाजाची जाण …व सेवा करण्याचीओढ,,तळमळ,असणारे लोक असतील तर आपला समाज निश्चित सुधारल्याशिवाय राहणार नाही ..रामचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व सूत्रसंचालन आयुष्यमान गवळी रमेश यांनी केले …


Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.