स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा,ता.२३ (प्रतिनिधी ) विद्यार्थी दशेत कष्टाला पर्याय नाही.शालेय शिक्षण घेत असताना घरच्या प्रतिकुल परिस्थितीला सामोरे जात अभ्यासात सातत्य ठेवल्यास उच्चशिक्षित होण्यासाठी यशाला गवसणी घालता येते.पालकांनीही आपल्या मुलांचा कल पाहुन आवडीच्या क्षेञात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे मत जि.प.माजी विद्यार्थीनी पुणे येथील प्रा.डाॕ.सरला देशपांडे यांनी व्यक्त केले. येथील जिल्हा परिषद प्रशाला व जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे शुक्रवार ता.२३ रोजी दहावी परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या गुणवंत मुलामुलींचा परंडा सेवा मंडळाकडून रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी व वक्ते म्हणून प्रा. डॉ.साधना देशमुख- देशपांडे (पुणे),यांची उपस्थिती होती.यावेळी राज्याचे माजी कृषी संचालक जयंत देशमुख,जेष्ठ महिला सरलाताई महाजन,मधुकर लोखंडे,कमल वाघमारे,मुख्याध्यापक रामचंद्र इंगळे, दिनकर पवार,आलमगीर सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक परंडा सेवा मंडळाचे सचिव डॉ. आनंद पाटील (छत्रपती संभाजीनगर) यांनी केले प्रमुख अतीथिंचा परिचय परंडा सेवा मंडळाचे तालुका सचिव मधुकर लोखंडे यांनी करून दिला. यावेळी माजी कृषी संचालक जयंत देशमुख म्हणाले की, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा करिअर निश्चिती करताना प्रयत्नांचे महत्व हवे. प्रयत्नाची पराकाष्ठा केल्याशिवाय यश मिळत नाही.शालेय मुलामुलींनी मोबाईलचा वापर न करता दररोज वर्तमान पञाचे वाचन ठेवावे.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद कन्या प्रशालेतील गुणवंत विद्यार्थीनी तृप्ती अविनाश निकाळजे,
निकिता संतोष शिंदे,
प्रज्ञा सुभाष बनसोडे,
तसेच जिल्हा परिषद प्रशाला परंडा येथील
विद्यार्थी बालाजी हनुमंत काळे,अभिजित रमेश शिंदे,
सलीम युनूस शेख,वरील विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम क्रमांक २५००, द्वितीय क्रमांक २००० व तृतीय क्रमांक १५०० रुपये व प्रमाणपत्र देण्यात आले.जि.प.चे माजी विद्यार्थी
प्रा.अविनाश वाघमारे इजिनियरींग कॉलेज पुणे यांच्याकडून
दोन्ही प्रशालेतील चालू वर्षी शिक्षण घेत असलेल्या इयत्ता नववी व दहावी मधील एकूण १४ मुलामुलींना दहा हजार दोनशे रुपये किमंतीची शालेय पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली.
महेश भातलवंडे यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले.
या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक बबन गवळे,शिक्षक नामदेव पखाले, सतीश खरात, आबासाहेब माळी, तानाजी मिसाळ, बाबुधी घाडगे, मिनाक्षी मुंढे,शुभदा पाटील,गीता देशमुख
रेखा ऊसराटे, गीता मंडलिक, अब्दुल गनी हन्नुरे, आनंद देशमुख आदिसह पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी केले तर आभार विशाल काशीद यांनी केले.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.