स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा तालुक्यातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांसमवेत भाजपा प्रदेश मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी स्नेहभोजन केले. यावेळी त्यांनी सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.
परंडा तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेले डोमगाव येथील कल्याणस्वामी मठ येथे आयोजित या स्नेह भोजनासाठी कार्यकर्त्यांनी स्वतःच्या भाजी-भाकरीचा डबा आणला होता. यावेळी मोदी सरकारने गेल्या ९ वर्षात केलेल्या लोकोपयोगी कामांबद्दलची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी केले.
यावेळी भारतीय जनता पार्टी परंडा तालुक्यातील सर्व जेष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी व कार्यकर्ते बंधु उपस्थित होते.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898



Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









