महाराष्ट्र विद्यालयात योग दिन साजरा.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

दिनांक २१ जून २०२३ वार बुधवार रोजी महाराष्ट्र विद्यालय बार्शी याठिकाणी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. योगासनाची सुरुवात विद्यालयातील सहशिक्षक श्री.सुरेश महामुनी यांनी केल्यानंतर कर्मवीर योगासने व प्राणायाम केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने योगाचे प्रात्यक्षिके कु. हिमानी राऊत (नॅशनल योगा प्लेयर) व स्नेहा वेदपाठक या दोघींनी योग प्रोटोकॉल नुसार प्रात्यक्षिके व त्याचे महत्त्व याबद्दलची माहिती दिली.
कार्यक्रमाची सूत्रसंचालन प्रा.किरण गाढवे यांनी कले.
त्याप्रसंगी संस्थेचे खजिनदार श्री.जयकुमार शितोळे व संस्थेचे ट्रस्टी माजी प्राचार्य चंद्रकांत मोरे ,कर्मवीर योगासन केंद्रातील पदाधिकारी , क्रीडोत्तेजक मंडळातील पदाधिकारी , तसेच विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती के.डी.धावणे,उपमुख्याध्यापक आर.बी.सपताळे ,क्रीडा शिक्षक अनिल पाटील, योगेश उपळकर, पुष्कराज पाटील,सर्व विद्यार्थी, व सर्व शिक्षक उपस्थित होते.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!