जय भगवंत ढोल-ताशा,ध्वज पथक, बार्शी. ने जपले सामाजिक भान.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

१०० गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

बार्शी : जय भगवंत ढोल-ताशा,ध्वज पथक, बार्शी. च्या वतीने १०० गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

प्रथम नगरपालिका शाळा नं.५ मध्ये क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून या उपक्रमास सुरुवात करण्यात आली.

शहरातील नगरपालिका शाळा नं.५, साधना कन्या प्रशाला, सुलाखे हायस्कूल, मॉडेल हायस्कूल,कन्या प्रशाला, न्यु हायस्कूल, टेक्निकल हायस्कूल तसेच इतर काही शाळेतील एकुण १०० जणांना साहित्य देण्यात आले.

सामाजिक भान जपत जय भगवंत च्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी विद्यार्थी शिक्षण साहित्यापासून वंचित राहू नये या दृष्टीने जय भगवंत ढोल-ताशा,ध्वज पथक,बार्शी. च्या वतीने शालेय साहित्य वाटप कार्यक्रम घेण्यात आला.

या साहित्यात स्कूल बॅग, २०० पानांच्या ५ वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, पट्टी, पॅड, पाणी बाटली ई. देण्यात आले.

या उपक्रमासाठी सर्व शाळांचे मुख्याध्यापक स्वामिराव हिरोळीकर, विक्रम टकले, नागनाथ देवकते, प्रज्ञा वाघमारे, विनिता काळे, शोभा संचेती, श्री. बुचडे तसेच शिक्षक रामचंद्र इकारे, प्रताप दराडे, सूर्यकांत चोरमुले, धनाजी सोनटक्के, समीर वायकुळे, प्रसन्न देशपांडे यांनी सहकार्य केले.

यावेळी पथकाचे अध्यक्ष उमेश काळे, पथक प्रमुख हर्षद लोहार,प्रविण परदेशी,अविनाश बोकफोडे, अप्पासाहेब घबाडे, विजय कदम, गणेश ढगे, अक्षय काजळे, श्री रणदिवे, अबोली पालके, अतिश पालके, अंकिता बारंगुळे, ज्ञानेश्वरी गुमटे, संतोष चव्हाण, आकाश तिकटे, अमित मिसाळ, प्रविण पावले व पथकातील सदस्य उपस्थित होते.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!