महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची पहिली बैठक

starmazanews_v

starmazanews_v

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898महाराष्ट्र वैद्यकीय वस्तु खरेदी प्राधिकरणाच्या अनुषंगाने आज शनिवार, दिनांक १७.०६.२०२३ रोजी मा. मुख्यमंत्री महोदय श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक सह्याद्री सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.

(१) महाराष्ट्र वैद्यकीय वस्तु खरेदी प्राधिकरण अधिनियम, २०२३ च्या अनुषंगाने प्राधिकरणाच्या कार्यान्वयासाठी विनियमाच्या मसुद्यास मान्यता देण्यात आली.

(२) महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण अधिनियम, २०२३ च्या आस्थापनेकरीता पदभरतीबाबतची कार्यवाही संबंधित विभागांनी तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

(३) महाराष्ट्र वैद्यकीय वस्तु खरेदी प्राधिकरणाच्या कार्यालयासाठी भाडेतत्वावर जागा घेण्याबाबतच्या प्रस्तावास मंजूरी देण्यात आली.

(४) महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाच्या कार्यक्रम आराखडयास मान्यता देण्यात आली

(५) महाराष्ट्र वैद्यकीय वस्तु खरेदी प्राधिकरणास सन २०२३-२४ या वित्तीय वर्षाकरीता लागणाऱ्या आवश्यक खर्चास मान्यता देण्यात्त आली

(६) हाफकीन कक्षाकडे उपलब्ध असलेला अखर्चित निधी तात्काळ शासन खाती जमा करण्याच्या सुचना देण्यात आल्या

सदर बैठकीस आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. गिरीशजी महाजन तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, आयुक्त आरोग्य सेवा व इतर अधिकारी उपस्थित होते.


starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!