मोशी परिसरातील धोकादायक वीजवाहिनी होणार भुमिगत.

Picture of starmazanews

starmazanews

मोशी परिसरातील धोकादायक वीजवाहिनी होणार भुमिगत , माजी महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते कामाला सुरुवात
पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.


पिंपरी चिंचवड:- उघड्या वीजवाहिनीमुळे नागरी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदार संघांतर्गत उच्चदाब वीज वाहिन्या भुमिगत करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.मोशी आणि संभाजीनगर येथील वीज वाहिनी भुमिगत करण्याचे काम सुरू केले असून, त्यामुळे ४० हजार नागरिकांना दिलासा मिळाला आहे.भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्याकडे देहू रस्ता, मोशी, संभाजीनगर कॉलनी १,२आणी ३ परिसरातील घरांवरुन जाणारी उच्चदाब वीजवाहिनी भुमिगत करण्याबाबत स्थानिक नागरिकांनी मागणी केली होती.त्या अनुषंगाने पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे १ हजार मीटर वीज वाहिनी भुमिगत करण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली.
यावेळी माजी महापौर राहुल जाधव, माजी नगरसेविका सारीखा बोर्हाडे, अश्विनी जाधव, नितीन बोर्हाडे, मंगेश हिंगणे,सागर हिंगणे, सोनम जांभुळ कर,नाना सासवडे, राजेश सस्ते, गणेश सस्ते,वंदना आव्हाट, राहुल सस्ते, यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!