स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- पिंपरी चिंचवड शहरात विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडला. धुवाधार पावसाने बॅटिंग केल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची तारांबळ उडाली. सकाळी उन्हाचा कडाका जाणवला दुपारी अचानक वातावरणात बदल झाला. ढग दाटून आले आणि अचानक पावसाला सुरुवात झाली. पिंपरी चिंचवड शहरात गारांचा पहिलाच पाऊस नागरिकांनी अनुभवला ठिकठिकाणी पाण्याचे तळे काही तासातच साचले. त्यातच वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. नौकर वर्गाची घरी जाताना धांदल उडाली. सायंकाळी साडेपाच वाजायच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. चाकरमान्यांनी कामावरून घरी जात असताना पाऊस आल्याने कामगारांनी दिसेल तिथे आडोसा घेतला. नाले पहिल्याच पावसात वाहू लागले पावसात शहरवासी यांचे चांगलेच हाल झाले तर अनेक जण पावसाने सुखावले चिमुकले घराबाहेर गारा जमा करताना दिसून आले पुढील काही दिवस ढगांच्या पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.