आमदार महेश दादा लांडगे यांचा महावितरण अधिकार्यांना दणका.

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- पिंपरी भोसरी आणि परिसरातील वीज समस्यांसंदर्भात प्रशासन बेजबाबदारपणे वागत असून २४ तासांत वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्यास तयार राहा.नागरिकांच्या आंदोलनाचे नेतृत्व मी स्वतः करेन असा इशारा भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिला.विशेष म्हणजे, आमदार लांडगे यांनी बैठकीतून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला.अधिकारी मनमानीपणे कारभार करीत असुन, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे उपमुख्यमंत्री कार्यालयातून महावितरणच्या कारभाराची झाडाझडती झाली.मोशी, प्राधिकरण,आव्हाने वस्ती, भोसरी गावठाण, चक्रपाणी वसाहत, इंद्रायणीनगर,या भागातील वारंवार विजपुरवठा खंडित होत आहे. या पाश्र्वभूमीवर आमदार लांडगे यांनी महावितरण कार्यालयात धडक दिली.भोसरी पावर हाऊस येथील महावितरण कार्यालय येथे तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी महावितरणचे पुणे जिल्ह्याच्या चे अधीक्षक अभियंता सतीश राजदीप, कार्यकारी अभियंता उदय भोसले,दत्ता गव्हाने, योगेश लोंढे, सम्राट फूगे,शिवराज लांडगे , दिनेश यादव, निखिल काळकुटे यांच्यासह पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!