परंडा (दि.१५) प्रतिनिधी गोरख देशमाने.
तांदुळवाडी ते देऊळगाव नादुरुस्त पुला चे काम करणे
पुलाचे काम पूर्ण करून रस्ता न केल्यास
रस्ता रोको आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा…
तांदुळवाडी ते देऊळगाव रस्त्यामध्ये दोन पुल येत असून सध्या त्या दोन्हीही पुलाची अवस्था खुप बिकट व खराब झालेली आहे सध्या खूप जीर्ण झालेल्या पुलावरती रस्त्याचे थातूर-मातूर काम करणे सुरू आहे
त्यामुळे भविष्यात हा पुल खचून अपघात होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे दुर्घटना होऊन मनुष्यहानी होऊ शकते.
तरी या रस्त्याचे काम करण्यापूर्वी पुलाचे काम करणे जरुरीचे आहे व नंतरच रस्त्याचे काम करावेत,
पुलाचे बांधकाम योग्य काम न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिनांक १/६/२०२३ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परंडा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
असे निवेदन सादर करण्यात आले आहे या निवेदनावर जिल्हा धाराशिव अध्यक्ष आबासाहेब ढवळे तालुका उपाध्यक्ष रोहित टिकोरे
परंडा शहर अध्यक्ष नवनाथ कसबे
यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898



Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.








