रा गे शिंदे महाविद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

Picture of starmazanews

starmazanews

रा गे शिंदे महाविद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा
(प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहन )
स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी डॉ शहाजी चंदनशिवे.

परांडा दि 1 मे 2023 येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग व शारीरिक शिक्षण विभाग यांच्या वतीने करण्यात आले होते .व्यासपीठावर प्राचार्य डॉ सुनील जाधव , उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने , सांस्कृतीक विभाग प्रमुख प्रा.डॉ शहाजी चंदनशिवे उपस्थित होते . यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ भागातील प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये ज्या ज्या महापुरुषांनी योगदान दिले आहे त्यांना अभिवादन करत शैक्षणिक वर्ष 2022 – 23 मधील आढावा घेऊन पुढील वर्षासाठी शुभेच्छा दिल्या .कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक डॉ शहाजी चंदनशिवे यांनी करुन आभार मानले .

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!