महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी हसीब नदाफ यांची निवड.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

सोलापूर -दि. २१/०४/२०२३-सामाजिक बांधिलकी आणि लोक जागृतीचा वसा घेऊन अल्पसंख्याक समाजाबरोबरच बहुजन समाजाच्या लढ्यात अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते हसीब नदाफ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेसाहेब व काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा यांच्या शिफारशीने राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ईम्रान प्रतापगडी यांनी निवड केली आहे.


हसीन नदाफ हे गेल्या २५ वर्षापासून काँग्रेसमध्ये क्रियाशील असून सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे ते प्रवक्ते आहेत.मौलाना आझाद विचार मंचचे प्रदेश जनरल सेक्रेटरी,ओबीसी-व्हीजेएनटी बहुजन परिषदेचे प्रदेश कार्यालयीन जनरल सेक्रेटरी, नदाफ-पिंजारी-मंसूरी जमातीचे प्रदेश उपाध्यक्ष,अ.भा. मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचे खजिनदार, जमियत उलमा-ए- हिंद,सोलापूरचे जनरल सेक्रेटरी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख,मुस्लिम बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशनचे प्रदेश संघटक, समविचार सभेचे समन्वयक म्हणून सध्या कार्यरत आहेत.
ओबीसी-व्हीजेएनटी अल्पसंख्याक समाजाच्या विविध प्रश्नावर ते गेल्या ३५ वर्षापासून क्रियाशील आहेत. ऑल इंडिया स्टुडन्टस फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष,समाजवादी पार्टी सोलापूरचे जिल्हाध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र प्रमुख,दूरसंचार सल्लागार समिती, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य आदी पदावर त्यांनी यापूर्वी काम केले आहे.मुस्लिम ओबीसी चळवळीच्या स्थापनेपासून ते आजतागायत कार्यरत आहेत.
त्यांच्या निवडीने महाराष्ट्र राज्यातील, राजकीय, सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रातील असंख्य कार्यकर्त्यांकडून अभिनंदन केले जात आहे…
————————————-

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!