स्टार माझा न्यूज:- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
दि.20 एप्रिल 2023 रोजी पंचायत समिती सभागृह परंडा येथे दिव्यांग बांधवांसाठी त्याना अवशक व उपयुक्त असणा-यां साहीत्य जसे कृत्रिम अवयव,विविध साधने, जिल्हा समाज कल्याण विभाग व एल्मिको कार्यालय मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने मोफत वाटप करण्यात येणार असून , त्या करीता प्रत्येक दिव्यांग बांधवांना लागणा-या साधनांची नोंदणी व मोजमाप घेण्यात येणार आहे..
करिता सर्व दिव्यांग बांधवानी याचा मोठ्याप्रमाणांवर लाभ घ्यावा..
असे अवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक वडेपल्ली यांनी केले आहे .
या करिता खालील कागद पत्रे सोबत आणावित…
1. आधार कार्ड
2. किमान 40% अपंग असल्याचे वैद्यकीय प्रमाण पत्र
3. उत्पन्न प्रमाणपत्र (रु 180000चे आत)
4.पासपोर्ट साईझ फोटो 2
.
या कागद पत्राचे आधारे आपल्या शहरातील महा-ई केंद्रात जावून नोंदणी करता येईल…
सर्वांनी याचा लाभ घ्यावा …
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.