नर्गिस दत्त हॉस्पिटल बार्शी येथे रुग्णावर होणार अल्पदरात अत्याधुनिक पद्धतीने उपचार.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

शुक्रवार दिनांक ७ एप्रिल २०२३ (जागतीक आरोग्य दिन) स्थळ- नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, बार्शी

संस्थेचे संस्थापक चेअरमन कै. डॉ. बी. एम. नेने यांचे संस्था उभारणी व संवर्धनातील मोत्याचे योगदान विचारात घेऊन त्यांचे निधनानंतर त्यांच्या स्मृतीचे कायमस्वरुपी जतन होण्यासाठी संस्थेच्या “अश्विनी रुरल कॅन्सर रिसर्च अँड रिलीफ सोसायटी नावाचा नामविस्तार करून डॉ. बी. एम. नेने अश्विनी रुरल कॅन्सर रिसर्च अँड रिलीफ सोसायटी’ या बदलासाठीची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन मे सहाय्यक धर्मादाय आयुक्त सोलापूर कार्यालयाने मान्यता दिली आहे. संस्था ही नवीन नावाने आपले सर्व व्यावहार या पुढील काळात करेल.

  • संस्थेने संस्थापक चेअरमन कै. डॉ. बी. एम. नेने यांनी रेडीएशनच्या उपचाराची अत्याधुनिक सुविधाची असलेली निकड व्यक्त केली होती. संस्थेच्या कार्यकारी मंडळाने प्राधान्याने अत्याधुनीक रेडीएशन मशीन Elekta Synergy Platform यु.के मेक मशीन खरेदीची धोरणात्मक निर्णय घेतला. या अत्याधुनीक मशीन साठी आवश्यक असणा-या संकरसाठी सुमारे १.५ कोटी रु खर्च केले, या अत्याधुनीक मशीनमुळे ग्णाना अत्याधुनीक रेडीएशनची सुविधा मिळणार आहे. या मशीन साठी संस्थेने रक्कम रु १६ कोटी ची गुंतवणूक केली असुन या मशीनमुळे रुग्णांना अत्याधुनीक उपचारासाठी सुविधेसाठी महानगरात जाण्याची गरज पडणार नाही व संस्थेच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ होईल.
  • कॅन्सर रुग्णांसाठी PET CT Scan ची उपचारादरम्यान वारंवार गरज भासते. या चाचणीमुळे पणाच्या आजाराचे निदान आजाराचा शरीरातील प्रार्दुभाव व आजाराच्या व्याप्याराची दिशा व सुयोग्य औषधाची निवड करणे सहजशक्य होते. अचुक निदान व अचुक उपचारामुळे रुग्णास फायदा होतो.

२०० किमी परीक्षात ही सुविधा नसल्याने सोलापूर जिल्हा बरोबर धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या ठिकाणच्या रुग्णाना पुणे अथवा मुंबई शिवाय पर्याय उपलब्ध नव्हता. या सुविधेसाठी करावी लागणारी गुंतवणूक व त्याचा परतावा विचारात घेता हा प्रकल्प संस्थेने हाती घेणे धाडसाचे ठरणार होते. कॅन्सर रुग्णांना महानगरात रुग्णास घेऊन जाण्याचा खर्च व यासाठीचे शुल्क विचारात घेता गोर- गरीब रुग्णाच्या आवाक्याबाहेरचे असल्याची बाब कार्यकारिणी मंडळास खुपत होती व यासाठी भरीव आर्थिक मदत मिळाली तरच हे शक्य होईल याची मनोमन खात्री पहली होती. या अनुशंगाने SBI Foundation, Mumbai यांचे कडुन पाठपुरावा करुन ही मदत मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्नशील राहाण्याचा कार्यकारिणीने निर्णय घेतला व याची सर्वस्वी जबाबदारी संस्थेचे ट्रेझरर बन्सीधर शुक्ला यांच्यावर सोपविण्यात आली श्री. बन्सीधर शुक्ला यांनी फेब्रुवारी २०२२ पासुन SBI Foundation, Mumbai कार्यालयातील संबंधीत अधिका-यांना समक्ष भेटून अविरतपणे संपर्कात राहून PET CT Scan मशीनसाठी रक्कम Rs. 4.49 कोटी SBI Foundation CSR द्वारे अर्थसहाय्य प्राप्त केले या मशीनसाठी अंदाजे रक्कम Rs. 8.25 कोटी गुतवणूक होईल. उर्वरीत रक्कम संस्था स्वनिधीमधून खर्च करण्यात येईल रुग्णांसाठी ही सुविधा ऑगस्ट 2023 पासुन कार्यान्वीत होईल असा आम्हास विश्वास वाटतो.

पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी (पीईटी) स्कॅन हा इमेजिंग चाचणीचा एक प्रकार आहे. शरीरातील रोग शोधण्यासाठी ते ट्रेसर नावाच्या किरणोत्सर्गी पदार्थाचा वापर करते. पीईटी स्कैन अवयव आणि ऊतक कसे कार्य करत आहेत हे दर्शविते, हे एमआरआय आणि सीटी स्कॅनपेक्षा वेगळे आहे. या चाचण्या अवयवांची रचना आणि रक्त प्रवाह दर्शवतात.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!