आ.राजाभाऊ राऊत यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सभागृहात आमसभा पार.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

बार्शी तालुक्यातील सर्व विभागाची संयुक्त आमसभा आमदार राजाभाऊ राऊत यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सभागृह,बार्शी या ठिकाणी पार पडली.

‌ आमदार राजाभाऊ राऊत यांच्या उपस्थितीत पार पडलेली ही आमसभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी आमदार राजाभाऊ राऊत यांनी बार्शी शहर व तालुक्यातील कृषी विभाग,पाणीपुरवठा विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग,घरकुल विभाग,आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग,जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, लघुपाटबंधारे विभाग,आरोग्य विभाग महिला व बालकल्याण विभाग,स्वच्छ भारत मिशन विभाग इत्यादी सर्व विभागातील प्रशासकीय कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेतला.उपस्थित अधिकाऱ्यांना शासकीय योजनांची तातडीने अमलबजावणी करण्याबाबत सूचना दिल्या.तालुक्यातील पाणीपुरवठा, सिंचनाचा प्रश्न,गावपातळीवरील विविध शासकीय निधीच्या माध्यमातून होणारी विकासकामे व तालुक्यात भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत आमदार राजाभाऊ राऊत यांनी सविस्तर आढावा घेतला व प्रशासकीय अधिकारी यांना योग्य त्या सुचना केल्या.

गावातील पाण्याचा प्रश्न,रस्ते,गटारी,दिवाबत्ती,घरकुले, दलित वस्ती योजना,पाझर तलाव,साठवण तलाव,शेतकऱ्यांचे प्रश्न, वीज आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली.तसेच ही कामे करताना प्रशासकीय स्तरावर कोणत्याही अडचणी येवु नये याचीही काळजी घेण्यात यावी व ग्रामीण भागाचा विकास करण्याकरिता शासन स्तरावरून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून घेतला जाईल असे आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले. तालुक्यातील विकासकामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीच तडजोड चालणार नाही.निकृष्ट कामे करणाऱ्यांना नोटिसा काढून त्यांच्याकडून खुलासे घेऊन योग्य त्या कारवाया करण्यात याव्यात असे आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले.

आमसभेला बार्शी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच व सदस्य,पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य,बाजार समिती संचालक, सोसायटी सदस्य,नगरपालीका नगरसेवक, सर्व विभागांचे प्रशासकीय अधिकारी तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!