स्टार माझा न्यूज:- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
दि २८/३/२०२३ रोजी सकाळी ९ वा राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री यांनी परंडा शहरातील मुगळीकर कुटुंबाला सांत्वनपर भेट दिली . गेल्या महिन्यात परंडा शहरातील फ्लॅश फोटोचे मालक रोहित मुगळीकर यांचे वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले . घरातला कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर खुप मोठ संकट निर्माण झाले. रोहितच्या दोन मुलापैकी लहान मुलाल मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा दुर्धर आजार आहे . कुटुबाची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच . ही बातमी सावंत साहेबाना समजताच त्यांनी मुगळीकर कुटुबाला भेट देऊन त्यांचे सांत्वन केले व मुलाच्या ट्रीटमेटचा संपुर्ण खर्चाची जबाबदारी घेतली . या वेळी शिवसेनेचे पदाधिकारी , हंसराज गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते .
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898


Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









