स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पुणे :-भाजपचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. ते ७२ वर्षांचे होते.प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते.मात्र ,त्यांची प्राणज्योत मालवलृयाची माहिती समोर आली.गिरीश बापट यांच्यावर संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे.अशी माहिती जगदीश मुळीक यांनी दिली.गिरीश बापट यांच्यामागे पत्नी ,मुलगा,सुन आणि नात असा परिवार आहे.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते, खासदार गिरीश बापट यांच्या निधनाची बातमी आली.पुणे जिल्ह्यातील एक प्रखर राष्ट्राभिमानी नेता आपण गमावला.माझ्या राजकीय जीवनात बापट साहेबांनी कायम ताकद दिली.२०१४ ते २०१९ या काळात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी पिंपरी चिंचवड शहरातील विकासकामांसाठी कायम सकारात्मक भूमिका घेतली.त्याच्या जाण्याने माझ्या राजकीय वाटचालीतील गुरुतुल्य मार्गदर्शन हरपला आहे.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









