स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- वाहतूक वॉर्डन हे केवळ हाताच्या इशार्याने वाहतूक नियमन करु शकतात , असे स्पष्टीकरण पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सतीश माने यांनी दिले आहे.याप्रकरणी माहिती मागविणारा माहितीचा अर्ज माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या कार्यकारिणीचे सदस्य प्रदीप नाईक यांनी केला होता.प्रदीप नाईक यांनी ट्राफिक वॉर्डन ही यंत्रणा का राबवली जात आहे.तिचा उपद्रव होत असुन ती नामशेष करावी,अशी मागणी केली होती.या अर्जाला उत्तर देताना सहायक आयुक्त सतीश माने यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड आयुक्तालया अंतर्गत वाहतूकीचे नियमण करण्यासाठी विविध वाहतूक विभागात ट्राफिक वॉर्डनची नेमणूक केली आहे.त्यांना वाहतूक नियमन हात इशार्याद्वारे करावे अशा सूचना आहेत.आपल्या पदाचा गैर वापर करत ट्राफिक वॉर्डन हे सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक करत असतात.त्याला कुठे तरी आळा बसावा यासाठी ही माहिती प्रकाशात आणणे गरजेचे होते.असे प्रदीप नाईक सांगितले यापुढे कोणताही ट्राफिक वॉर्डन पदाचा गैरवापर करीत असेल तर नागरिकांनी वाहतुक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रीतसर तक्रार नोंदवावी , असे आवाहन नाईक यांनी केले.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.