आरोग्यमत्री तानाजीराव सावंत वाढदिवसानिमित्त कुस्त्याचे जंगी मैदान गाजणार .
स्टार माझा न्यूज:- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा दि २५ : – परंडा – भूम – वाशी मतदार संघाचे आमदार तथा धाराशीवचे पालकमंत्री महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य बालकल्याण मंत्री ना. डॉ . तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समिती परंडा मैदानात दि . २७ मार्च रोजी जंगी कुस्त्यांचा आखाडा भरविण्यात आला आहे . दुपारी दोन वाजता कुस्त्या सुरु होऊन संध्याकाळी ७:३० वाजता आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या हस्ते समारोप होणार आहे . पै . पृथ्वीराज पाटील x पै. माऊली कोकाटे व पै . हर्षवर्धन सदगीर x पै. बालारफी शेख यांच्या दोन लाख एक्कावन हजाराच्या दोन कुस्त्या पाहायला मिळणार आहेत. तसेच पै. हनुमंत पूरी x पै . अनिरुद्ध पाटील व पै. विजप मांडवे x पै . शशिकांत गोंगार्ड यांची एक एक लाखाची निकाली कुस्ती होणार आहे . तसेच सोनबा गोंगाणे x देवेंद्र पवार , कालीचरण सोलंकर x समिर शेख , प्रशात जगताप x सतपाल सोनटक्के , योगेश तिंबोळे x सचिन बरगळे , सागर सुरवसे x राम कांबळे यांचेसह निकाली कुस्त्या होणार असून १०० रु . पासून ५००० पर्यंतच्या कुस्त्या मैरानात नेमल्या जाणार आहेत . सर्व कुस्त्या निकाली होणार असल्याचे या कुस्ती आखाड्याचे आयोजक राहुलभैय्या डोके युवासेना तालुका प्रमुख यांनी कळविले आहे .
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.