पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड: – हिंजवडी
९मार्च २०२३ अन्य धान्य,गॅस, डिजेल, पेट्रोलच्या गगनाला भिडलेल्या किंमतीमुळे सर्व सामान्य जनता होरपळत आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरले या सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वसामान्य नागरीक देशोधडीला लागल्याची आरोळी पिटवित केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात मुळशी तालुका कॉंग्रेसने महागाईची होळी पेटवून भाजप सरकारचा निषेध केला. कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या निषेध आंदोलनाला मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शिवाजीराव बुचडे,मुळशी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदिप साठे,भोर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल जाधव, हिंजवडी गावचे माजी सरपंच विशाल साखरे,म्हातोबा देवस्थान ट्रस्टचे विश्वत संदीप साखरे,अंकुश मारणे,यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









