पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड: -चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी आपल्याला चांगला कौल दिला आहे. आपल्यासाठी संधी असतानाही त्यांचे विजयात रुपांतर झाले नसले तरी खचून न जाता अधिक जोमाने पुढील निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सुचना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाना काटे यांच्यासह पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना दिल्या .चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे याच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर,राष्ट्रवादीचे प्रदेश समन्वयक सुहास उभे,राष्ट्रवादीचे विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, माजी नगरसेवक प्रभाकर वाघेरे,माजी आमदार उल्हास पवार यांची भेट घेऊन निवडणूकसंदर्भात चर्चा केली. यावेळी शरद पवार यांनी चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत प्रभाग निहाय माहिती घेतली. कोणत्या प्रभागात किती मते पडली ,कोणी कोणी काम केले ,आपल्यासाठी परिस्थिती सकारात्मक असतानाही आपण कोठे कमी पडलो यासह निवडणूकीतील प्रत्येक बारकाव्यांबाबत माहिती घेतली. यावेळी नाना काटे यांच्यासह उपस्थित प्रमुख मान्यवरांनी संपूर्ण माहित दिली.भाजपच्या नेत्यांनी शेवटच्या टप्प्यात प्रशासकीय यंत्रणेचा केलेला गैरवापर ,पैशांचा वापर,कार्यकर्त्यांना पोलीसांनी दिलेला त्रास यासह सर्व माहिती दिली.चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये झालेल्या चुकांमध्ये दुरुस्ती करून येणाऱ्या महापालिका निवडणुकींच्या तयारीला आतापासून लागा. येत्या काही दिवसांत विरोध पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत एक आढावा बैठक घेऊयात, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.










