स्टार माझा न्यूज :- परंडा प्रतिनिधि गोरख देशमाने
येणाऱ्या पावसाळ्यात खंडेश्वरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरणार : धनंजय सावंत
देवगाव येथील मंदिर पुनर्जीवित व सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन
परंडा : देवगाव (बु) याठिकाणी आमदार स्थानिक निधीतून आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी मारुती मंदिरासमोरील सभा मंडप व मंदिर पुनर्जीवित करण्याच्या कामासाठी १८ लक्ष रुपयाचा निधी स्थानिक आमदार निधीतून मंजूर केला आहे. सभा मंडप व इतर कामाचे भूमिपूजन सोमवारी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवगाव (बु) येथील मतदारांनी ९० टक्के मतदान करून डॉ तानाजीराव सावंत यांना भरघोसपणे मताधिक्य दिले होते. आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी मंत्रीपद ग्रहण केल्यानंतर येथील ग्रामस्थांनी मारुती मंदिराच्या समोरील सभागृहाच्या उभारणीसाठी निधीची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत, सभागृहासह मारुती मंदिर पुनर्जीवित करण्यासाठी पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी तब्बल १८ लाख रुपयांचा निधी आपल्या आमदार स्थानिक निधीतून मंजूर केला आहे. याच अनुषंगाने सोमवारी सभागृह व मंदिर पुनर्जीवित करण्याच्या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव, पंचायत समिती माजी सभापती सतीश दैन, जिल्हा परिषद माजी सदस्य शिवाजी पवार , आरोग्यदूत बालाजी नेटके, औदुंबर गाडे, कार्यक्रमाचे संयोजक शिवसेना शाखाप्रमुख लक्ष्मण मुसळे, सरपंच दत्ता ठाकरे, माजी सरपंच पांडुरंग पवार, अंगद मुसळे, पोपट घाडगे, रामचंद्र ठाकरे, रेवननाथ आरे, बाबासाहेब कदम, योगीराज लवंगारे, बाबुराव ठाकरे, पोलीस पाटील प्रकाश शिंदे, धनंजय पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्थानिक ग्रामस्थांनी देवगाव लाभक्षेत्रात कमी दाबाने विद्यूत पुरवठा होत असल्याच्या तक्रारी धनंजय सावंत यांच्याकडे केल्या. या तक्रारीचे निरासन करताना सावंत म्हणाले की, यांनी हि समस्या गेल्या आठवड्यापूर्वीच आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी गंभीरतेने घेतली असल्याचे सांगत देवगांव लाभक्षेत्रात ३३ केव्ही सबस्टेशन नव्याने उभे करण्यासाठी प्रस्तावित केले असून चार दिवसापुर्वी सोनारी कारखाना स्थळी महावितरणच्या मुख्य कार्यकारी अभियंता यांच्यासोबत सोबत बैठक झाली आहे . तेथे ३३ केव्ही सबस्टेशन उभारणीचा प्रस्ताव आराखड्यामध्ये समाविष्ट केल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी बहुसंख्य शेतकऱ्यांनी खंडेश्वरवाडी प्रकल्पाचे प्रलंबित काम तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. सदरील खंडेश्वरी प्रकल बंधाऱ्याच्या कामची मंजुरी घेण्याचा प्रस्ताव नाशिक कार्यालयाकडे पाठविण्यात आला असून लवकरच त्याला मंजुरी मिळणार असून, येत्या उन्हाळ्यामध्ये हे काम सुरू होणार असून, येणाऱ्या पावसाळ्यामध्ये खंडेश्वरी प्रकल्पामध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा उपलब्ध होणार असल्याचा निश्चय सावंत त्यांनी ग्रामस्थ समोर व्यक्त केला.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.