स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड: – पिंपळे गुरव चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या आमदार अश्र्विनी जगताप यांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. पिंपळे गुरव येथील निवासस्थानी आज शनिवारी जावून पालकमंत्री पाटील यांनी जगताप यांची भेट घेतली. आज लक्ष्मण जगताप यांचे मासिक पुण्यतिथी. त्यांच्या पच्श्रात अश्र्विनी जगताप यांनी भाऊंचा चिंचवडच्या विकासाचा संकल्प घेऊन काम सुरु केले आहे. चिंचवडकरांनी अश्र्विनीवहिनींना विजय करून एकप्रकारे भाऊंना श्रध्दांजली वाहिली. आज वहिनींचे अभिनंदन केले आणि भाऊंना श्रध्दांजली अर्पण केल्याचे पालकमंत्री पाटील म्हणाले. भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे,प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, लेखा समितीचे माजी अध्यक्ष सचिन पटवर्धन, भाजपचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात, माजी महापौर उषा ढोरे,आदी उपस्थित होते.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









