चिंचवड मतदार संघातील जनतेचा कौल मला मान्य आहे. – नाना काटे

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- चिंचवडच्या जनतेने स्व.लक्ष्मण जगताप यांना विजयाची श्रध्दांजली वाहिली हे निकालातुन स्पष्ट झाले. तसेच भाजपने साम दाम दंड भेद नीतीचा अवलंब करत ही निवडणूक लढवली. निवडणुकीत पराभव दिसु लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलीस दलाच्या माध्यमातून भाजपने सत्तेचा गैरवापर करत पोलीस ठाण्यात बसवून ठेवले .चिंचवडमधील जनतेने दिलेला आशिर्वाद मला मान्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मागील निवडणूकांच्या तुलनेत एक लाखाचे मताधिक्य घेतले आहे. तसेच महाविकास आघाडीतील मतांच्या विभागणीमुळे आणि भाजपने सत्तेचा गैरवापर करत मिळवलेला हा नैतिक विजय लोकशाहीला शोभणारा नाही. ही निवडणूक भावनिक ,दहशत व पैशाचा अमाप वापर करुन लढवली गेली.आम्ही ही निवडणूक विकाशाच्या जोरावरती लढवली त्यामुळे जनतेने निवडणूक हातात घेतली होती. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)राष्ट्रीय काॅंग्रेससह पाठिंबा देणाऱ्या सर्व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मला आशिर्वाद दिलेले सर्व मतदार बंधूभगिनी युवक मित्रांचे मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच २०२४ला चिंचवड विधानसभेत महाविकास आघाडीचा आमदार राहील असे आजच स्पष्ट करतो.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!