स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड: – मोशी आमदार महेश दादा लांडगे यांनी शब्द पाळला,मोशी परिसरातील नक्षत्र आयलॅंड सोसायटीधारकांना पाणी समस्येचा सामणा करावा लागत होता. यावर तोडगा काढण्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या सुचनेनुसार, नवीन कनेक्शन कार्यान्वित करण्यात आले. त्यामुळे सुमारे ७० लीटर पाणी पुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी ,सोसायटीधारकांना दिलासा मिळणार आहे. नक्षत्र आयलॅंड सोसायटीमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. याबाबत चिखली मोशी,पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसाईटी फेडरेशन अध्यक्ष संजीवन सांगळे यांच्यासह पदाधिकारी आणि रहिवाशांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते. यासंदर्भात सोसायटीधारकांची काही दिवसांपूर्वी बैठकही झाली होती. त्या बैठकीत लवकरात लवकर हा प्रश्न सोडवण्यात येईल ,असे आश्र्वासन आमदार महेश लांडगे यांनी दिले होते. दरम्यान, नवीन आळंदी रस्ता रोड येथून नवीन नळजोडणी देण्याबाबत प्रशासकीय पातळीवर सकारात्मक निर्णय घेण्यात आला.त्या जलवाहिनीचे काम आता पुर्ण झाले आहेत. त्याद्वारे सोसायटीधारकांना नवीन नळजोड देण्याचे कामही सुरु झाले आहे. यामुळे सुमारे ३७५सदनिकाधारकांना दिलाशा मिळणार आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सागर हिंगणे यांनी दिली.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.