शिवसेनेच्या मा.नगरसेविका मीनाली यादव ,यांचा प्रश्न? राष्ट्रवादीच्या नेत्याचा स्थानिक कार्यकर्त्यांवर भरोसा नाय का?

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी-चिंचवड:- राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीच्या वतीने चिंचवड मतदार संघात नाना काटे यांना उमेदवारी दिली खरी, मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा स्थानिक नेत्यांवर विश्वास नसल्याचे दिसत आहे. मावळ व पुणे जिल्ह्यातील नेते विरोधी पक्ष नेते अजित पवार हे स्थानिक कार्यकर्त्यांना फोन करत आहेत. त्यांचे खाजगी सचिव नगरसेवकांच्या घराबाहेर पाहण्यासारखे बसून आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा स्थानिक कार्यकर्त्यावर भरवसा नाही काय? असा सवाल शिवसेनेच्या माजी नगरसेविका मीनल यादव यांनी केला आहे. यादव म्हणाल्या महाविकास आघाडीच्या वतीने राहुल कलाटे यांचे नाव चर्चेत होते. त्यांना डावलून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली मात्र, राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकल्याचे दिसत आहे. स्थानिक कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विश्वास नसल्याचे चित्र आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार हे स्वतः शहरातील नेते व कार्यकर्त्यांना फोन करत आहेत. पिंपरी चिंचवड मधील नेत्यांपेक्षा पुणे जिल्ह्यातील व मावळातील नेतेच प्रचारात रिमोट कंट्रोल हाती घेऊन आहेत. स्थानिक नेते व कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भरोसा नाही काय ?उमेदवार अजित पवार, सुनील शेळके आहेत, की नाना काटे असा सवाल मीनल यादव यांनी केला आहे. स्थानिक कार्यकर्त्यावर विश्वास दाखवणाऱ्या राष्ट्रवादीला कार्यकर्त्यांनी धडा शिकवावा असे आवाहनही यादव यांनी केले आहे.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!