स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी-चिंचवड:- चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूकीमध्ये चुरस वाढली आहे.माघारीच्या शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत ५ जणांनी अर्ज मागे घेतले आहे.आता २८ जण रिंगणात असणार असुन दोन ईव्हीएम मशीन लागणार आहेत.राहुल कलाटेंनी अर्ज माघारी न घेतल्याने ही निवडणूक तिरंगी होणार आहे.कलाटे यांना अर्ज माघारी घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी फोनही केला होता.तसेच शिवसेनेचे सचिव अहिरही सकाळपासून चिंचवडमध्ये ठाण मांडून होते.चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक जाहीर झाली आहे.अर्ज भरण्याकरता ३१ जानेवारीपासून सुरुवात झाली होती. ७ फेब्रुवारीपर्यंत ४० उमेदवारांनी ५३ दाखल केले बुधवारी अर्जाचे छाननी केल्यानंतर ४०उमेदवारापैकी सात उमेदवारांचे अर्ज पत्र झाले आहे. त्यानंतर 33 उमेदवार शिल्लक राहिले अर्ज माघाराची मुदत शुक्रवार दुपारी तीन पर्यंत होती. गुरुवारी अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्या दिवशी एकाही उमेदवारांनी अर्ज मागे घेतला नाही .शुक्रवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी पाच जणांनी अर्ज माघारी घेतले.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









