शंकर जगताप यांनी ही भरला उमेदवारी अर्ज

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज :-पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर


पिंपरी-चिंचवड:- चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे.शंकर जगताप यांचा ‘डमी’ अर्ज भरला असुन आमच्या उमेदवार अश्विनी जगताप याच राहणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम युतीच्या अधिकृत उमेदवार अश्विनी जगताप यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचवेळी उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असलेले शंकर जगताप यांनीही अर्ज दाखल केला.त्यामूळे चर्चेला उधाण आले होते.त्याबाबत विचारले असता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,डमी अर्ज भरावा लागतो.शंकर जगताप यांचा डमी अर्ज आहे. अश्विनी जगताप याच आमच्या उमेदवार आहेत.उमेदवार बदलू शकतो का असे विचारले असता इथे बदल नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!