रवींद्र धंगेकरांचा विश्वास, विजय आमचाच होणार

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज :-पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर


पुणे;- पुण्यातून “मविआ” अर्ज दाखल करण्यासाठी रवाना कसबा विधानसभा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा कार्यक्रम जाहीर झाला. आहे पोट निवडणूक येत्या २६ फेब्रुवारीला पार पडणार आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, संभाजी ब्रिगेड सर्वांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर अर्ज दाखल करणार आहेत. कालपर्यंत महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर झाले नव्हते कसबा मतदार संघाची जागा काँग्रेस पक्ष लढविणार असल्याचा निर्णय झाला असून तेथून रवींद्र हेमराज धंनेकर यांनी उमेदवार जाहीर करण्यात येत असल्याचे नाना पाटोळे यांनी ट्विट करून सांगितले आहे. भाजपचे जोरदार शक्ती प्रदर्शन केले असून महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी दंगेकर यांच्याबरोबर जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले आहेत. रवींद्र धंगेकर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विश्वासू कार्यकर्ते होते. मनसेत असताना त्यांनी कसबा विधानसभा मतदारसंघात अनेक सामाजिक कामे केली आहेत जानेवारी 2017 मध्ये काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा 2009 मध्ये दंगेकर यांनी निवडणूक लढवली होती अवघ्या सात ते आठ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता त्यावेळी गिरीश बापट विजय झाले होते. त्यांनी गिरीश बापटांना चांगली लढत दिली होती.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!