स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी-चिंचवड:- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.पिंपळे सौदागर येथून रॅली काढत थेरगाव येथील ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, चिंचवडचे निरीक्षक मावळचे आमदार सुनील शेळके, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, पिंपरीच्या आमदारांना बनसोडे, वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार विलास लांडे, शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन भोसले, जिल्हाप्रमुख गौतम चाबूक स्वार, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते. महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कालाटे यांच्या स्पर्धा होती. दोघांनाही उमेदवारीसाठी जोर लावला होता. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने नाना काटे यांची उमेदवारी जाहीर केली त्यानंतर सकाळी पिंपळे सौदागर इथून रॅलीला सुरुवात झाली. रहाटणी मार्गे रॅली थेर गावातील ग क्षेत्रिय कार्याल दाखल झाले निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला भाजपच्या अश्विनी जगताप आणि महाविकास आघाडीचे काटे यांच्यात लढत होईल.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









