अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल, भाजपचे जोरदार शक्ती प्रदर्शन.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर


पिंपरी-चिंचवड:- चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या भाजप, बाळासाहेबांची शिवसेना ,आरपीआय राष्ट्रीय समाज पक्ष, व शिवसंग्राम युतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी आज सोमवार रोजी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला, थेरगाव येथील निवडणूक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीरंग बारणे, शहर अध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, माजी महापौर उषा ढोरे, आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप ,माजी नगरसेवक पक्षाचे सर्व स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील जनसंपर्क कार्यालयापासून सकाळी नऊ वाजता पदयात्रेला सुरुवात झाली. गावातील भैरवनाथ, मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सृष्टी चौक, सुदर्शन चौक, जवळकर नगर, कल्पतरूप फेज वन, सुदर्शन स्वराज, गार्डन मार्गे पिंपळे सौदागर गावठाण पुढे शंकर मंदिर ,राहटणी चौक, विमल गार्डन, बळीराज गार्डन, कुणाल गार्डन ,बापूजी बुवा मंदिर थेरगाव हॉस्पिटल मार्गे ग प्रभाग कार्यालयापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!