राष्ट्रवादीच्या बैठकीपूर्वीच नाना काटे यांनी घेतला उमेदवारी अर्ज.

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर


पिंपरी-चिंचवड:-चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जशी जवळ येत आहे तसे राजकीय घडामोडींना वेग येवू लागला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांशी चर्चा करणार आहेत.त्यापुर्वीच महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीकडून प्रबळ दावेदार असलेल्या नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.निवडनुकीसाठी मंगळवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.परंतु, अद्यापही भाजप किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल हे ठरले नाही.उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवली आहेत. आहे असताना राष्ट्रवादीचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केल्याने चर्चेला उधाण आले आहे.काटे यांनी २०१४ मध्ये चिंचवड विधानसभेची निवडणूक लढविली होती.त्यावेळी त्यांना ४२हजार५५३ मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.पोटनिवडनुक लढविण्यासाठी काटे तीव्र इच्छक आहेत.आता पक्ष कोणाला उमेदवारी देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.याबाबत बोलताना नाना काटे म्हणाले,मी उमेदवारी अर्ज घेतला आहे.अजितदादांबरोबर आज बैठक आहे.पक्षाकडुन आदेश आल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा पूर्व तयारी म्हणून अर्ज घेतला आहे.अजितदादा जे निर्णय देतील त्यानुसार आम्ही पुढचे पाऊल उचलू.

www.starmazanews.com संपादक रियाज :- पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!