स्टार माझा न्यूज:- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पुणे:- जी २० बैठकीच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सर्व जी२०प्रतिनिधींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाच्या अंतिम टप्प्यावर ढोल लेझीमच्या तालावर परदेशी पाहुण्यांनी ठेका धरला ढोल, लेझीम,टाळ हाती घेत महाराष्ट्राच्या सांस्कृतिला दाद दिली.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक घडामोडी या विभागांचे संयुक्त सचिव सॉलोमन अरोकिराज , विभागीय आयुक्त सैरभ राव, कुलगुरू डॉ कारभारी काळे, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भैरी भवानी परफामिंग आर्ट्सच्या कलाकारांनी सागा ऑफ मराठा एम्पायर या संकल्पनेवर आधारीत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे विविधरंगी दर्शन घडविणार्या कलांचे सादरीकरण केले.प्रारंभी शाववंदना , मर्दानी खेळ, पोतराज, वाघ्या मुरळी, गोंधळ,छक्कड संकेत भाषा कला असलेली करपल्लवी यासोबतच तान्हाजी मालुसरे यांना समर्पित सादरीकरण करण्यात आले.शिवराज्याभिषेक गीताने कार्यक्रमात परमोच्च बिंदू गाठला. त्यानंतर अखेरीस ढोल लेझीम,ताशांचे जोरदार सादरीकरण झाले.आणी परदेशी पाहुण्यांना यात सामील होण्याचा मोह आवरला नाही.त्यांनी देखील सर्व कलाकारांना दाद देत ढोल ताशा च्या गरजांवर ठेका धरला.तर काहींनी टाळ वाजवून आनंद व्यक्त केला.
जी२० बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले.पालकमंत्र्यानी काही प्रतिनिधींशी संवाददेखील साधला , पुणे शहराने पाहुण्यांच्या स्वागताची चांगली तयारी केली आहे.पाहुण्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वेळी व्यक्त केलेला आनंद लक्षात घेता पुणेकरांचे प्रयत्न सफल झाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.महाराष्टाची सांस्कृतिक लोकधारा सर्वांनाच आपलेसे करणारी असल्याचेही ते म्हणाले.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898




