www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898
दि:06जानेवारी 2023 रोजी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे शिंदे महाविद्यालय परंडा, यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे आंदोरा ता. परंडा जि.उस्मानाबाद येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव मा. श्री संजयजी निंबाळकर साहेब, उद्घाटक म्हणून प्रा. डॉ.दयानंद शिंदे (शंकरराव पाटील महाविद्यालय भूम) प्रमुख पाहुणे म्हणून मा.प्रा.डॉ मकरंद चौधरी (जिल्हा समन्वयक रा. से.यो.), उद्घाटनाचे प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव, आई.क्यू.ए.सी समन्वयक तसेच उपप्राचार्य प्रा.डॉ.महेशकुमार माने, आंदोरा गावचे सरपंच सौ. रेखा दयानंद शिंदे व उपसरपंच सौ. वर्षा महावीर कांबळे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. 06 जानेवारी2023 ते 12 जानेवारी 2023 या कार्यकाळात हे शिबिर आयोजित केलेले आहे .या शिबिराअंतर्गत ग्रामस्वच्छता ,आरोग्य तपासणी, जलसंवर्धन, व्यक्तिमत्व विकास ,वृक्षारोपण ,रक्तदान शिबिर, नव मतदार जनजागृती असे अनेक उपक्रम हे आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटन प्रसंगी रा. से.यो. जिल्हा समन्वयक प्रा.डॉ. मकरंद चौधरी यांनी शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन केले . संस्थेचे सचिव मा.श्री संजयजी निंबाळकर साहेब यांनी अध्यक्षीय समारोप पर शिबिरार्थ्यांना शिबिराचा उद्देश व महत्त्व पटवून सांगितले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.कृष्णा परभने यांनी केले, सूत्रसंचालन डॉ.प्रा.सचिन चव्हाण यांनी केले व आभार डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी मानले. शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.अमरसिंह गोरेपाटील, प्रा.डॉ.कृष्णा परभने, सहकार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.अरुण खर्डे ,प्रा.डॉ. सचिन चव्हाण ,प्रा. डॉ.सचिन साबळे प्रा.डॉ.संभाजी गाते तसेच महाविद्यालयातील स्वयंसेवक विद्यार्थी,प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी हे परिश्रम घेत आहे .

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.