महापालिका ठेवणार घंटा गाडीवर कमांड कंट्रोल सेंटरमधून नियंत्रण.

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर


पिंपरी चिंचवड;- पिंपरी चिंचवड शहरात देशातील सर्वात स्वच्छ,व सुंदर राहण्यायोग्य शहर म्हणून नावलौकिक मिळवण्यासाठी महापालिका प्रशासनाने जोरदार कंबर कसली आहे.स्वच्छ सर्वेक्षण 2023 या स्पर्धेत शहराचा पहिल्या दहामध्ये क्रमांक आणण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सुक्ष्म नियोजन करण्यात येत आहे.यासाठी स्वच्छतेचे विविध उपक्रम, स्पर्धा, कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.त्याचबरोबर घरोघरचा कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या वेळेवर जातात की नाही यावर कमांड कंट्रोल सेंटरमधून नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा 2023 यामध्ये सहभाग घेतला आहे.शहर दिवसेंदिवस वाढत असताना शहरातील कचराही सातत्याने वाढत असुन पालिका घरोघरी कचरा संकलन करत आहे.सध्या दररोज बाराशे टन कचरा निर्माण होत आहे.गतवर्षी विविध उपक्रम राबवूनही शहराचा स्वच्छतेमध्ये 19वा क्रमांक कायम होता.त्यामुळे महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी जनजागृती, आरोग्य कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी, शहरातील सर्व शाळा झिरो वेस्ट , स्वच्छ वार्ड स्पर्धा,कचरा कुंडीमुक्त शहर,कचरा मुक्त झोपडपट्टी यासह विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.तसेच शहरातील ज्या भागातील मोकळ्या जागेत कचरा टाकला जातो,त्या जागेचे सौंदर्यीकरण, रांगोळी काढून स्वच्छतेबाबतचा संदेश देण्यात येत आहे.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!