www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898
प्रतिनिधी —
जगातील कोरोना प्रादुर्भावाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी घेण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले, महाराष्ट्रातील कोविड-19 विषयी माहिती देताना राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घेण्यात आली आहे, याचबरोबर कोविड अनुरूप वर्तन पंचसूत्रीचे काटेकोर पालन करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात आजपर्यंत Bf7 चा एकही रूग्ण आढळलेला नाही. राज्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती यावेळी दिली.
चाचण्या, ट्रॅकींग, उपचार, लसीकरण आणि कोविड अनुरूप वर्तन अशी पंचसूत्री राबविण्याचे केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत. याप्रमाणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.
कोवीड 19 चा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून देखील वेळोवेळी मदत, सहकार्य करण्यात येईल असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.मनसुख मंडवीयाजी यांनी सांगितले.


Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.










