बार्शी | वृत्तपत्र संपादक संघ संचलित डिजिटल मिडीया प्रेस क्लब ची नुतन कार्यकारणी ची निवड झाली असुन ही कार्यकारणी सन २०२२-२०२३ या वर्षात पदावर राहून काम करणार आहे
वृत्तपत्र संपादक संघाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत नवीन कार्यकारणी ची निवड करण्यात आली.
अध्यक्षपदी योगेश लोखंडे, उपाध्यक्ष प्रशांत गायकवाड, कार्याध्यक्ष रियाज पठाण, सहसचिव सागर गरड, खजिनदार आझम बागवान यांची बहुमताने निवड करण्यात आली.
नुतन अध्यक्ष योगेश लोखंडे यावेळी बोलताना म्हणाले की पत्रकारांच्या हितासाठी व न्यायासाठी मी सदैव तत्पर असेल व संघटनेच्या हितासाठी कायम योगदान देईन येणाऱ्या काळात पत्रकार संरक्षण कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी बोलून दाखवले. सर्व सदस्य व उपस्थितांकडुन नवीन कार्यकारणीला पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.