डॉक्टर,नर्सचे पगारासाठी कामबंद आंदोलन.

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर


पिंपरी चिंचवड:- महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या डॉक्टर, स्टाफ नर्स यांचा नोव्हेंबर महिन्याचा पगार अद्यापही झाला नाही.दिवाळी बोनसही दिला नाही.पगाराबाबत ठेकेदाराकडून दररोज वेगवेगळ्या तारखा दिल्या जात असल्याचा आरोप करत डॉक्टर, स्टाफ नर्सह विविध २७० कर्मचाऱ्यांनी आज सकाळी काही वेळ आणि दुपारी ओपीडी बंद झाल्यानंतर जोरदार आंदोलन केले महापालिकेने कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत डॉक्टर स्टाफ नर्स यांना मानधनावर घेतले होते.त्यानंतर महापालिका प्रशासनाने सर्वांचा विरोध डावलून विविध रुग्णालयांना मेडिकल, पॅरामेडिकल कर्मचारी पुरविण्यासाठी ठेकेदार नेमले.त्यांच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने कर्मचारी घेण्यास सुरुवात केली.महापालिकेच्या रुग्णालयात आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून डॉक्टर नर्स आणि इतर कर्मचारी घेण्यास आले.मात्र या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने समस्या सुरवातीपासून सुरू झाली.तीन तीन महिने ठेकेदाराकडून पगार दिला जात नाही.हक्काच्या कामाचा पगार मिळविण्यासाठी डॉक्टर, नर्स यांना वारंवार काम बंद आंदोलनचे हत्यार उपसावे लागत आहे.त्यानंतर थकित पगार दिला जातो.पुन्हा पगार थकविला जातो.याबाबत कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा आंदोलन केले.दर तीन महिन्यांनी कर्मचाऱ्यांना पगारासाठी आंदोलन करावे लागते.
थेरगाव रुग्णालयाचे प्रमुख डॉ.अभयचंद्र दादेवार म्हानाले,पगार मिळाला नसल्याने कंत्राटी डॉक्टर, नर्स कर्मचाऱ्यांनी आज आंदोलन केले.त्याचा रूग्णसेवर कोणताही परिणाम झाला नाही.पर्यायी व्यवस्था उपलब्ध केली होती.तर वैद्यकीय विभाग प्रमुख डॉ.लक्ष्मण गोफणे म्हणाले, महापालिका रुग्णालयांत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार देण्याबाबत संबंधित ठेकेदार एजन्सीला सुचेना दिल्या आहेत.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!