करसंकलन विभागाची उच्चस्तरीय चौकशी करा —- संदीप वाघेरे

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर


पिंपरी चिंचवड:-महापालिकेच्या करसंकलन विभागामार्फत शहरातील विविध मिळकतीची बेकायदेशीरपणे मनमानी पद्धतीने नोंदणी करुन शास्तीकर व मिळकतकर आकारणीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याची तक्रार करीत महापालिकेचे कोट्यावधी रुपयांची नुकसान करणार्यांना दोषी अधिकाऱ्यांवर उच्चस्तरीय चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले की,महानगरपालिकेचे जकात बंद झाल्यापासून उत्पनाचे साधन हे मिळकतकर, पाणीपट्टी व बांधकाम परवानगी विभागामार्फत राहिले आहे.महापालिकेच्या करसंकलन विभागामार्फत शाळेला व्यावसायिक मिळकतकर आकारणी करण्यात येत असल्याची बाब निदर्शनास आलेली असुन अनेक मिळकतीना बोगस कागदपत्रांच्या आधारे करसंकलन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचारी यांच्या संगनमताने नोंदी करून घेण्यात आलेल्या आहेत.यामध्ये तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कुलमुखत्यार पत्राच्या आधारे मिळकतीचे विभाजन, विभागणी व हस्तांतर करु नये असा आदेश ५ऑक्टोंबर २०१९ रोजी काढला होता. मात्र काही अधिकारी व कर्मचारी संगनमताने हे आदेश धाब्यावर ठेऊन चिखली, तळवडे व शहरातील विविध भागात अनधिकृत बांधकामांचे कुलमुखत्यार नोटराईज्ड कागदपत्रांच्या आधारे नोंदी करून महापालिकेचा कोट्यवधींच्या मिळकतकर,शास्ती कर व राज्य शासनाचा मुद्नांक व नोंदणी शुल्क बुडवत आहेत.त्यामूळे महापालिकेचे व राज्य सरकारचे आतोनात नुकसान होत आहे.हे अशा पद्धतीने महापालिका मिळकत कर नोंदणी करणार असाल तर शहरातील अनधिकृत बांधकाम असलेल्या अन्य नागरिकांनाही शास्ती करांमध्ये सवलत अथवा माफी देण्यात यावी,अशी आग्रही मागणी वाघेरे यांनी केली आहे.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!