स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:-भामा आसखेड धरनातुन चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत 8.8 किलोमीटर लांबीची उंदचन जलवाहिनी आणी 18.90 किलोमीटर गुरुत्व जलवाहिनी अशी एकुण 27.70 किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात येणारी जलवाहिनी खेड आणि मावळ तालुक्यातील सहा गावांमधून येणार आहे. त्यासाठी भूसंपादन केले जानार आहे.पिंपरी चिंचवड शहराचा लोकसंख्या ववढीचा वेग आणि भविष्यातील सन2031पर्यंतचा लोकसंख्या विचारात घेऊन महापालिकेकडुन सरकारला आंद्रा व भामा आसखेड धरणातुन पाणी आरक्षित करण्यासाठी मागणी करण्यात आली होती त्यानुसार ,सरकारणे आंद्रा धरणातुन 60.79 दशलक्ष घनमिटर असे एकुन 97.66 द.घ.पाणी कोटा आरक्षणास 24 आक्टोंबर 2018रोजी मान्यता दिली आहे. या पाण्याचा वापर शहरात नव्याने विकसीत होणार्या चिखली, चऱ्होली, वडमूखवाडी ,दीघी आणी मोशी परिसरासाठी होणार आहे. महापालिकेने यापुर्वी आंद्रा व भामा आसखेड धरणातुन पाणी आणण्याच्या कामासाठी डीआए कन्सल्टंट यांची व्यवस्थापन सल्लागार म्हणुन नेमणूक केली आहे. या दोन्ही कामांचा अर्थसंकल्प डीआरए कन्सल्टंट या सल्लागारामार्फत तयार करण्यात आला आहे.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.