स्टार माझा न्यूज:- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:-भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना चोक प्रत्त्युत्तर देत सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्यावेळी पाकड्यांच्या लक्षात आले की हिंदुस्थान केवळ चर्चा समझोत्याच्या भाषेत नाही. तर आपल्या कृतीला जशाश तसे उत्तर देत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या काही नेत्यांचा जळफळाट अजुनही सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खालच्या भाषेत बोलत अहेत हा केवळ पंतप्रधानांचा नव्हे ,तर तमाम भारतीयांचा अवमान आहे. अशी टीका भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यानी केलि .पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल पाकिस्तानचे विदेश मंत्री बिलावत भुट्टो याने अक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केले. याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड भाजपातर्फे मारवाडी येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी पाकिस्तानच्या झेंड्याचे दहन करण्यात आले.आंदोलनाला विधान परिषदेच्या आमदार उमा आपरे ,माजी महापौर उषा ढोरे ,माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके संघटन सरचिटणीस अमोल थोरात ,सरचिटणीस राजू दुर्गे मोरेश्वर शेडगे ,प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, प्रदेश चिटणीस अमित गोरखे, युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे यांच्यासह माजी नगरसेवक कुंदन गायकवाड, राजेंद्र लांडगे,अनूराधा गोरखे ,महीला अध्यक्ष उज्वला गावडे, संजय परळीकर आदी उपस्थित होते. आमदार लांडगे म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानांचा आदर प्रत्येकाच्या मनात आहे. मात्र पाकिस्तानी नेत्यांना भारताच्या पंतप्रधानांबाबद आकस वाटतो .भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामुळे पाकिस्तानी नेत्यांचा जळफळाट झाला आहे.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.










