स्टार माझा न्यूज:- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:-निगडी राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.त्या पार्श्वभूमीवर शहरातील विद्यार्थ्यांसाठी शारीरिक चाचणी,लेखी परीक्षा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन सोशल हॅंड्स फाउंडेशन आणि ओझर्डे इन्स्टिट्यूट ऑफ रॅडिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील गरजू युवक युवती यांच्यासाठी मोफत पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण शिबीर प्राधिकरण निगडी येथे संपन्न झाले.समाजातील ६०ते७० युवक युवती यांनी या संधीचा लाभ घेतला.प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.भुषन ओझर्डे शिक्षण तज्ञ, संचालक, ओझर्डे इन्स्टिट्यूट ऑफ रॅडिकल एज्युकेशन यांनी मार्गदर्शन केले शिबिरात पोलीस भरतीचा अर्ज कसा भरावा, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात,त्यांची छाननी कशी होते याची माहिती दिली.शारीरिक चाचणी संदर्भात प्रा.कुमठाळे संचालक एन.एस.पीटी.यांनी मार्गदर्शन शिबिरात शारीरिक चाचणीमध्ये किती प्रकारच्या परिक्षा द्यावे लागतात . त्यासाठी गुण कसे दिले जातात . तसेच शारीरिक चाचणीत जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी कोणकोणते शारीरिक व्यायाम केले पाहिजे,आहार काय असावा याबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित पिंपरी चिंचवड मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल कामराज व सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे यांनी सहभागी युवकांना प्रेरणादायी संदेश दिले सुत्रसंचलन जयश्री ओझर्डे यांनी केले.तर आभार दिपाली ओझर्डे यांनी केले.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









