पत्रकारांनारेल्वे तिकीट दरात पुन्हा सवलत चालू करा, खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी.

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर


पिंपरी चिंचवड:-थेरगांव देशातील अधिस्वीकृती धारक पत्रकारांना रेल्वेच्या तिकीट दरात देण्यात येणारी 50 टक्के सवलत पुन्हा सुरू करण्याची मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली.खासदार बारणे म्हणाले, पत्रकार रात्रंदिवस कुटुंबापासून दूर राहून आपले कर्तव्य बजावताना.कोरोना काळात संपूर्ण देश लाॅकडाउनमध्ये असतानाही पत्रकारांनी आपले कर्तव्य बजावत लोकांना जागरूक करून महत्वाची माहिती दिली.आपल्या कर्तव्याबाबत सदैव जागरूक राहिले.तर , देशातील अनेक पत्रकार कोरोनाचे बळीही ठरले आहेत.कोरोनामहामारीपूर्वी देशातील अधिस्वीकृती धारक पत्रकारांना रेल्वेच्या लांबलं पल्याच्या आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी भांड्यात 50 टक्के सवलत मिळत होती.पत्रकार त्यांचे कर्तृत्व बजावत होते.पण कोरोनाच्या काळात रेल्वे गाड्या बंद झाल्या आणि नंतर पत्रकारांना रेल्वे भांड्यात देण्यात येणारी ५०टक्के सवलतही बंद करण्यात आली.आता देशातील कोरोनाची परिस्थिती सामान्य झालि आहे.सर्व रेल्वे गाड्या पुर्वी प्रमाणे धावू लागल्या आहेत.मात्र पत्रकारांना रेल्वे भांड्यात ५०टक्के सवलत देणे बंद झाले आहे.त्यामुळे रेल्वेमंत्र्यांना माझी विनंती आहे की, पत्रकारांना दिलेल्या तिकीट दरातील ५०टक्के सवलत पुर्ववत करण्यात यावी.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!