www.starmazanews.comपुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:-पिंपरी येथे भरणार एक दिवसीय कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर व स्नेहमेळावा राष्ट्रीय श्रमिक आघाडी (महाराष्ट्र राज्य) आणि पिंपरी-चिंचवड वकिल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्यांदाच या वर्षी एक दिवसीय कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर व स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे.हे शिबिर रविवारी ११ डिसेंबर रोजी पिंपरीतील सावित्रीबाई फुले सभागृहात सकाळी ११ते दुपारी २ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.अशी माहिती राष्ट्रय श्रमिक आघाडी संघटनेचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी दिली आहे.या.शिबिराचे उद्धाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह करणार आहेत.यावेळी कार्यक्रामाचे अध्यक्ष म्हणून पिंपरी चिंचवड वकिल संघटनेचे माजी अध्यक्ष अँड.सुशील मंचरकर हे उपस्थित राहणार आहेत.यावेळी पिंपरी चिंचवड वकिल संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अँड.नारायण रसाळ , उपाध्यक्ष अँड जयश्री विलास कुटे,सचिव अँड.गणेश शिंदे, सहसचिव अँड मंगेश नढे,यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.या शिबीरासाठी सुमारे २५० वकिल बांधव हे उपस्थित राहणार आहेत.या स तत्कारानंतर जेष्ठ विधि तज्ञ डॉ उदय वारूंजीकर हे वकिलासाठी नवीन संधी या विषयावर तर विधी तज्ञ डॉ अँड.राजेंद्र हे अनभुले हे मेहरबान सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी या विषयावर तसेच अँड प्रशांत क्षीरसागर हे प्रलंबित न्यायालयीन प्रक्रियेवर अंमलबजावणी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.याबरोबरच अँड नारायण रसाळ हे शेवटी अध्यक्षीय आढावा सांगणार आहेत .
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









